Genus Epidemicus Homeopathy: A Boon For Mankind - homeopathy360

Genus Epidemicus Homeopathy: A Boon For Mankind

Author: Dr Amit Bhasme
Genus Epidemicus होमिओपॅथीचे मानवजातीला एक वरदान
(in Marathi)

संसर्गजन्य आजार! जगाचा एकंदरीत इतिहास बघितलातर आपल्याला असे लक्षात येते की माणसाच्या मृत्यूची काही ठराविक करणे होती जसे की, आकस्मिक मृत्यू, गरोदरपणातील आजारांमुळे झालेला मृत्यू, वृद्धापकाळाने झालेला मृत्यू आणि सर्वात जास्त म्हणजे संसर्गजन्य आजारांमुळे झालेला मृत्यू. संसर्गजन्य आजार मानवजातीच्या जन्मापासूनच माणसाच्या जीवनावर महत्वाचा प्रभाव दाखवत आहेत. आजकालच्या काळात जेव्हां अँटिबायोटिक्स व औषधुपचारांची मुबलकता आहे तेंव्हा एखाद्या बाळाला जुलाब किंवा Pneumonia सारखा आजार झाला असेल तर आपल्याला फारशी काळजी वाटत नाही परंतु जेंव्हा वैद्यकीयशास्त्र आजच्या एवढे विकसित झाले नव्हते, अँटिबायोटिक्सचा शोध लागला नव्हता तेंव्हा हेच आज साधे वाटणारे जुलाब Pneumonia सारखे आजार जीवघेणे ठरत होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे मानवजातीच्या इतिहासामधे अनन्यसाधारण महत्व राहिले आहे. 
हे संसर्गजन्य आजार आजच्या विकसित काळातही खूप मोठी हानी पोहोचवत आहेत. अलीकडच्या काळामधे SARS, Swine Flu आणि आता Corona Virus यांनी मोठी जीवित आणि आर्थिक हानी केलेली आहे. जगातील सर्वोच्य आरोग्य संस्था (WHO) व इतर आरोग्य संस्था सध्याच्या Corona Virus संसर्गाविरुद्ध लढण्याचे प्रयत्न करत आहेत. हा आजार नाका तोंडाद्वारे पसरणारा असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असते तसेच बाधित रोग्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होणे सहज शक्य असते. त्यामुळे ह्या आजारावर उपयुक्त औषधांचा व प्रतिबंधात्मक (लस/Vaccine) औषधांचा शोध लावण्याचे काम प्राधान्याने चालू असते. 
वैद्यकीय शास्त्रामधे Prevention Is Better Than Cure म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला ह्या विचारला फार मोठे महत्त्व दिलेले आहे आणि ह्याच विचारांना सहमत होमिओपॅथी चिकित्सापद्धती काम करते. 
होमिओपॅथी ही एक निसर्गाच्या तत्वांवर आधारित एक स्वतंत्र अशी चिकित्सा पद्धती आहे जी काही मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे जसे लक्षण साम्यतेचा सिद्धांत, औषधाच्या प्रभाविकारणाचा व सिद्धीकरणाचा सिद्धांत, अल्पतम् मात्रा, व्यक्तीसापेक्षतेचा सिद्धांत अश्या महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. 
विविध प्रमाणात सर्व आजारांमधे, सर्व वयोगटातील रुग्णांबरोबरच तीव्र (Acute) आणि जुनाट (Chronic) प्रकारच्या आजारांमधे आपली उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या होमिओपॅथिक चिकित्सापद्धतीचा तीव्रतेने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आटोक्यात आणण्यामधेही मोठा वाटा आहे. होमिओपॅथी मधे अश्या सिद्धांताला Genus Epidemicus असे म्हणतात.
Genus Epidemicus हा सिद्धांत होमिओपॅथीच्या Like Cures Like म्हणजे सम: समं शमयति या मूलभूत तत्वावर आधारित आहे, सर्वसामान्य भाषेमधे सांगायचे झाले तर ज्या पदार्थामुळे जी लक्षणे निर्माण होतात त्याच पदार्थाचा औषध म्हणून उपयोग करता येतो उदा: विषाने विषाला मारणे. 
Genus Epidemicus मधे विशिष्ट संसर्गजन्य आजाराने बाधित असलेल्या विविध रुग्णांमधील सामान्य लक्षणांची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास करून होमिओपॅथिक चिकित्सापद्धतीने जे औषध औषध निवडले जाते अश्या उपचार पद्धतीला Genus Epidemicus असे म्हणतात. याद्वारे संसर्गजन्य आजारावरच्या साथीमध्ये निवडलेल्या औषधाचा प्रतिबंधात्मक उपयोग करता येतो. 
आपण Corona Virus च्या साथीमध्ये सुद्धा होमिओपॅथिक Genus Epidemicus औषधाचा लाभ घेऊ शकता. यासाठी आपण अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटून आपली सखोल माहिती देऊन हे औषध प्राप्त करू शकता. 
कोणतेही प्रतिबंधात्मक औषध घेतले म्हणजे इतर प्रतिबंधात्मक काळजी घ्यायची नाही असे होत नाही. सर्व प्रकारची काळजी, प्रतिबंधात्मक औषधी, शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून आपण व आपले कुटुंब संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव करू शकता.
संसर्गजन्य आजाराच्या आपदेमध्ये प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाणारे Genus Epidemicus किंवा इतर कोणत्याही प्रभावी मार्गाचा अवलंब केल्यामुळे देशाची जीवित व आर्थिक हानी कमी होण्यास मदत होते, म्हणून अश्या प्रतिबंधक उपायांना महत्व देणे गरजेचे आहे. 
मागील काही दशकांमध्ये वेगवेगळ्या सरकारी पातळीवर भारतामधे व इतर देशामध्ये Genus Epidemicus द्वारे निवडल्या गेलेल्या होमिओपॅथिक औषधाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी उपयोग करण्यात आलेला आहे उदा: Japanese Encephalitis, Cholera, Spanish flu, Meningitis या आजारांमधे होमिओपॅथीचे Genus Epidemicus औषधे उपयुक्त ठरल्याचे दिसते, त्यामुळे Genus Epidemicus हे मानव जातीसाठी वरदान आहे असे म्हणता येईल.

डॉ. अमित  भस्मे
होमिओपॅथिक तज्ञ, पुणे 

To view his story, click here.

Posted By

Team Homeopathy 360